ताज्या बातम्या

WhatsApp Account Banned: व्हॉट्सअॅपचे मोठे पाऊल, एप्रिलमध्ये 16 लाख भारतीय खाती बंदी, जाणून घ्या कारण?

WhatsApp Account Banned:व्हॉट्सअॅपने आपला 11वा सुरक्षा मासिक अहवाल जारी केला आहे. या अहवालात कंपनीने व्हॉट्सअॅप टर्म (WhatsApp term) आणि सेवा आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपने आयटी नियम 2021 अंतर्गत एप्रिल महिन्याचा अहवाल जारी केला आहे.

अॅपच्या ताज्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये 16 लाखांहून अधिक भारतीय खाती बॅन (Indian Accounts Ban) करण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्मच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या अहवालात 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंतचा डेटा आहे.

व्हॉट्सअॅपची तयारी काय आहे? –
या प्रकरणात व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग (End-to-end encrypted messaging) सेवेतील गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप उद्योगात आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही आमचे प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ, प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे.

अहवालात काय आहे? –
त्यांनी सांगितले की, IT नियम 2021 अंतर्गत आम्ही एप्रिल 2022 चा अहवाल जारी केला आहे. युजर सेफ्टी रिपोर्ट (User Safety Report) मध्ये व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या तक्रारी, त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईसह व्हॉट्सअॅपने गैरवापर टाळण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील देण्यात आला आहे. ताज्या मासिक अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यात 16 लाखांहून अधिक व्हॉट्सअॅप खाती बंद केली आहेत.

कोणत्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी आली? –
साधारणपणे, व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्याचे कारण कंपनीचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणे (Non-compliance with guidelines) हे आहे. खोटी माहिती शेअर केल्याबद्दल काही खाती बंदी घालण्यात आली आहेत.

त्याच वेळी काही वापरकर्त्यांना संदेशाची पडताळणी न करता फॉरवर्ड करण्यासाठी आणि इतर कारणांसाठी बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. फेक न्यूज रोखण्यासाठी अॅपने व्हेरिफाय एक्सटर्नल लिंक (Verify external link) आणि फॉरवर्डेड मेसेज लेबल यासारखी अनेक पावले उचलली आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts