ताज्या बातम्या

WhatsApp Alert : वापरकर्त्यांनो सावधान! तुम्हालाही ‘या’ नंबरवरून येत असतील कॉल तर तुम्हीही व्हाल कंगाल

WhatsApp Alert : तुमच्यापैकी अनेकजण WhatsApp वापरत असतील. WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्यामुळे WhatsApp चा आनंद डबल होतो. अशातच आता जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे.

कारण तुम्हीही आता यामुळे कंगाल होऊ शकता. तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही एका झटक्यात तुमचे लाखो रुपये गमावू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा कारण अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून एक कॉल येत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

या नंबरवरून कॉल आला तर याल अडचणीत

नुकतेच अनेक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून अवांछित कॉल आणि व्हिडिओ कॉल येत असून, जे +84 (व्हिएतनाम), +62 (इंडोनेशिया) आणि +223 (माली) या आंतरराष्ट्रीय नंबरवरून करण्यात येत आहेत.

अनेक जणांना या देशांतून कॉल आला आहे त्यामुळे हे ग्राहक आलेल्या कॉल्समुळे सावध झाले असून या स्कॅमरना त्यांचे नंबर कसे मिळाले याबद्दल त्यांना चिंता आहे. दरम्यान WhatsApp VoIP नेटवर्कद्वारे काम करत असून, त्यामुळे हे लोक कोणत्याही देशातून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॉल करतात. यामुळेच असे प्रकार दिवसेंदिवस वाढत अनेकजण पैसे किंवा वैयक्तिक डेटा गमावत आहे.

अशी होते फसवणूक

याबाबत एका ट्विटर युजरने आपला अनुभव शेअर असून त्याला एका इंटरनॅशनल नंबरवरून मेसेज आला होता. पाठवणाऱ्याने स्वत:ची ओळख व्हिएतनाममधील नोकरी प्रदाता म्हणून केली होती. त्याने त्या व्यक्तीला यूट्यूब व्हिडिओवरील ‘लाइक’ बटण दाबण्याचे काम दिले होते.

मात्र हा एक घोटाळा असून जो मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. स्कॅमर पीडित व्यक्तीला दुर्भावनापूर्ण अॅप इंस्टॉल करून किंवा टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्यास सांगतात. त्यानंतर त्यांना स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात येऊन त्यांची फसवणूक होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts