ताज्या बातम्या

WhatsApp Feature : व्हॉट्सअ‍ॅप करत आहे न्यूजलेटर टूलवर काम, वापरकर्त्यांना ‘असा’ होणार फायदा

WhatsApp Feature : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या कोट्यवधी ग्राहकांना आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. कारण WhatsApp सध्या न्यूजलेटर या टूलवर काम करत आहे. Wabetainfo ने या फीचरबद्दल एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

दरम्यान आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी WhatsApp सतत नवनवीन आणि शानदार फीचर घेऊन येत असते. अशातच आता हे फिचर लवकरच ग्राहकांसाठी येणार आहे. हे फिचर कसे काम करेल ते जाणून घेऊयात सविस्तर..

या नवीन फीचरबद्दल व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करणारी वेबसाइट Wabetainfo.com ने रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आगामी फीचरला न्यूजलेटर म्हटले जाणार की नाही याबद्दल कंपनीकडून अजूनही कोणतीही पुष्टी झालेली नाही.

परंतु, या फीचरचे नाव निश्चित झाले नसताना, हे फीचर न्यूजलेटरच्या नावाने ओळखले जात आहे. हे फिचर वापरकर्त्यांसाठी कसे उपयुक्त ठरेल ते जाणून घेऊया.

निवडता येणार पर्याय

रिपोर्टनुसार, माहिती ट्रान्समिशनशी निगडित या फीचरमुळे लोकांना उपयुक्त अपडेट्स सहज मिळू शकणार आहे. इतर प्लॅटफॉर्मप्रमाणे, वापरकर्ते त्यांना कोणाचे ऐकायचे आहे आणि कोणत्या ब्रॉडकास्टरचे अनुसरण करायचे ते निवडता येईल.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर परिणाम होणार का?

अहवालात असेही म्हटले आहे की स्टेटस पेजमध्ये न्यूजलेटरसाठी पर्यायी विभाग समावेश केला जाण्याची शक्यता आहे, जो वैयक्तिक चॅट्सपासून वेगळा असून याचा वैयक्तिक संदेशांच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर कोणताही परिणाम होणार नाही.

अनेक फीचर्स आहेत उपलब्ध

मागील काही वर्षांमध्ये, WhatsApp ने प्लॅटफॉर्म विकसित करण्यास आणि सर्व वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्म अधिक उपयुक्त बनवण्यासाठी नवीन फीचर्स जोडण्यास सुरुवात झालेली आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपच्या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग मर्यादांचाही समावेश केला आहे.

काही दिवसापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर 30 पेक्षा जास्त फोटो किंवा व्हिडिओ पाठवता येत नव्हते, मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सना 100 पेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ पाठवता येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts