Whatsapp Tips : आजचा काळ हा सोशल मीडियाचा (social media) आहे आणि तो स्पष्टपणे दिसतही आहे, कारण जवळपास प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियाचा वापर करत असते.
फेसबुक (Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram) याशिवाय लोक व्हॉट्सअॅपचाही (WhatsApp) भरपूर वापर करतात. हे एक मेसेंजर अॅप आहे, ज्याद्वारे लोक मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवर आमच्या प्रायव्हसीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
अशा स्थितीत विचार करा की तुमचे व्हॉट्सअॅप अकॉउंट दुसरे कोणी चालवत असेल तर काय होईल? अशा परिस्थितीत, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे दुसरे कोणी व्हॉट्सअॅप वापरत आहे की नाही हे शोधणे. चला तर मग हे कसे जाणून घ्यायचे ते सांगतो.
तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता
स्टेप 1
तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट दुसरे कोणी वापरत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्स अॅप उघडावे लागेल.
स्टेप 2
यानंतर, तुम्हाला अॅपच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या समोर अनेक पर्याय येतील, त्यापैकी तुम्हाला लिंक्ड डिवाइस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3
तुम्ही हा पर्याय निवडताच, तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट कोणत्या ब्राउझरवर व्हॉट्सअॅप वेब म्हणून चालू आहे ते तुम्हाला कळेल.
स्टेप 4
तुम्ही वापरत असलेला वेब ब्राउझर तुमचा नसेल तर तुम्हाला तो बंद करावा लागेल. अन्यथा कोणीही तुमचा डेटा चोरू शकतो
स्टेप 5
ते बंद करण्यासाठी, तुम्हाला दिसत असलेल्या ब्राउझरवर क्लिक करावे लागेल आणि नंतर येथे दिलेल्या लॉग आउटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप वेब बंद होईल