WhatsApp Upcoming feature : लाखो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण व्हॉट्सअॅप वर मेसेज पाठवत असताना अनेकांकडून खूप चुका होतात. सध्या व्हॉट्सअॅप आपल्या अनेक आगामी नवीन फीचरवर काम करत आहे.
त्यातील एका फीचरचे नाव एडिट बटण हे आहे. वापरकर्त्यांच्या चुका सुधारण्यासाठी व्हॉट्सअॅप हे फीचर सादर करणार आहे. त्यामुळे हे फिचर कधी येणार याबाबत वापरकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र व्हॉट्सअॅपने या फीचरच्या लाँच तारखेची कोणतीही माहिती दिली नाही.
WABetaInfo च्या नवीन रिपोर्टनुसार, कंपनी सध्या आपल्या एका नवीन अपडेटवर काम करत असून लवकरच या वापरकर्त्यांना मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे वापरकर्ते त्यांची कोणतीही चूक लवकर तसेच सहज दुरुस्त करू शकतील. रिपोर्टनुसार, WhatsApp iOS 23.6.0.74 अपडेटसाठी नवीनतम WhatsApp बीटा आवृत्तीवर काम करत असून अद्यतनानंतर, वापरकर्ते संदेश संपादित करण्यास सक्षम तसेच संपादित संदेशाच्या स्थितीबद्दल माहिती मिळवू शकणार आहेत.
फिचर असे करेल काम
व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे वापरकर्ते आता त्यांची कोणतीही चूक लवकर तसेच सहज दुरुस्त करू शकणार आहेत. नवीन अहवालानुसार, वापरकर्त्यांना त्यांचे संदेश पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत संपादित करता येणार आहेत. संपादित केलेले संदेश हे संदेश बबलमध्ये संपादित लेबलसह चिन्हांकित केले जाणार आहेत. वापरकर्त्यांना ते संदेशासह फॉरवर्ड केलेल्या टॅगसारखे पाहायला मिळतील.
कधीपासून वापरता येणार फिचर
नवीनतम आवृत्ती वापरत असणाऱ्यांना वापरकर्त्यांना हा संदेश दिसेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा कि जे लोक जुनी आवृत्ती वापरत आहेत ते या नवीनतम आवृत्तीवर अपग्रेड करेपर्यंत संपादन संदेश पाहता येणार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या फोनवर हे फीचर वापरत असला तर प्राप्तकर्त्याकडे अॅपची अपडेट केलेली आवृत्ती असली तरच त्या वापरकर्त्यांना ही संदेश सुधारणा दृश्यमान होईल.अजूनही व्हॉट्सअॅपने त्यांच्या या आगामी फीचरची अधिकृत प्रकाशन तारीख जाहीर केली नाही, परंतु ते लवकरच समजेल
नवीन डेस्कटॉप अॅप कॉलमध्ये सुधारणा
इतकेच नाही तर व्हॉट्सअॅपकडून आता नवीन डेस्कटॉप अॅप अपडेटसह ग्रुप कॉलमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तर वापरकर्ते आता ग्रुप कॉलमध्ये जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करू शकतात. मेटाच्या ब्लॉग पोस्टनुसार, विंडोजसाठी नवीन व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप आता वापरकर्त्यांना आठ लोकांपर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉल्स आणि 32 लोकांपर्यंत ऑडिओ कॉलचा आनंद घेऊ शकतात.