ताज्या बातम्या

Wheat Farming : खरंच काय..! फक्त एका एकरात खपली गव्हाचे घेतले ‘इतके’ विक्रमी उत्पादन; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Cultivation) केली जाते. आपल्या राज्यातही (Maharashtra) गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामात (Rabbi Season) गव्हाची पेरणी करत असतात. आज आपण वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका गहू उत्पादक शेतकरी (Wheat Producer Farmer) दाम्पत्याची यशोगाथा (Farmer Success Story) जाणून घेणार आहोत.

या अवलिया शेतकरी जोडप्याने मात्र एक एकर क्षेत्रात गव्हाची लागवड केली होती आणि यातून त्यांनी तब्बल 18 क्विंटल उत्पादन घेतले.

तुम्ही म्हणाल यात काय विशेष! हे खरं आहे की विशेष नाही मात्र या शेतकरी दांपत्याने एक एकर क्षेत्रात खपली गव्हाचे विक्रमी एकरी 18 क्विंटल उत्पादन (Wheat Production) घेतले आहे यामुळे त्याचे हे कार्य निश्चितच विशेष आहे. यामुळेच त्यांची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यातील मौजे इंझोरी येथील अजय ढोक व पूजा ढोक या शेतकरी दाम्पत्याने खपली गहू लागवडीचा निर्णय घेतला. आणि 1 एकरात याची पेरणी केली आणि त्याचे यशस्वी उत्पादन घेतले.

आता ह्या गव्हाची काढणी पूर्ण झाली असून गहू आरोग्याला अतिशय गुणकारी असल्याने या गव्हाला गावातून तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतून मोठी मागणी होत आहे. अजय ढोक व पूजा ढोक हे दांपत्य शेतीमध्ये कायमच नवनवीन प्रयोग करत असते.

असाच नवीन प्रयोग म्हणुन या दाम्पत्याने रब्बी हंगामात एक एकर क्षेत्रात खपली गव्हाची लागवड केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला.

त्यांनी हा गहू उत्पादित करण्यासाठी कुठलेच रासायनिक औषध वापरले नसून सर्व सेंद्रिय औषधे वापरली. ढोक दांपत्याने खपली गव्हाच्या पिकासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले.

यामुळेच या दांपत्याचा एका एकरावरील खपली गहू चांगलाच बहरला. या दाम्पत्याने मात्र एका एकरात अहोरात्र काबाडकष्ट करून आणि कष्टाला नियोजनाची सांगड घालून 18 क्विंटल असे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. या दाम्पत्याच्या गव्हाची नुकतीच काढणी झाली आहे आणि या गव्हाला परिसरात मोठी मागणी आहे.

अजय ढोक सांगतात की, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या वावरात आपल्या घरासाठी, परिवारासाठी खपली गव्हाचे उत्पादन घेतले पाहिजे.

या गव्हात पोषक घटक अधिक असल्याने याचे सेवन मानवी आरोग्यास विशेष फायदेशीर आहे. निश्चितच या दांपत्याचा हा अभिनव प्रयोग इतर देखील शेतकरी आत्मसात करतील आणि चांगला पैसा कमावतील शिवाय आरोग्याची जोपासना देखील करतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts