सायरनचा आवाज कानावर पडला की मनात धस्स होते…

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- अनेक कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. रुग्णवाहिकांवरील सायरन (भोंगा) आवाजाची आता समाजात भीती बसली.

तो आवाज कानावर पडला तरी लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली दिसते आहे. रुग्णवाहिका चालकांनी सायरनच्या नियमावलीचे कडक पालन करणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्ग सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णवाहिकांची संख्याही वाढली. कोरोनापूर्वी एखाद्याच रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज दिवसभरातून कधीतरी कानावर पडत असे.

आता मात्र परिस्थिती एकदम बदललेली आहे. सायरन वाजवत रुग्णवाहिका अंतर कापतात. आता हा आवाज कानावर पडला तरी ही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली दिसते.

विवेकानंद नर्सिंग होमचे वैद्यकीय अधिकारी प्राचार्य डॉ. विलास कड यांनी देखील हे निरीक्षण नोंदवले. लाॅकडाऊनमुळे रस्ते मोकळे आहेत. अशा परिस्थितीत अपवादात्मक सायरनचा वापर व्हावा.

मात्र त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. सायरनचा आवाज कानावर पडला की मनात धस्स होते, असे गृहिणी जया साबळे यांनी सांगितले. अगदी मध्यरात्री सायरनच्या आवाजाने मनात धस्स झाल्याचे गृहिणी इंद्राणी बाराई यांनी सांगितले.

रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असेल, तरच सायरन वाजवावा. गरजे पुरता अल्प कालावधीसाठी वाजवावा, असे स्पष्ट नियम आहेत.

आपण स्वतः या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत आहेत. मात्र अनेक रुग्णवाहिका रुग्णवाहिका चालकांना ही नियमावली माहित नाही. त्यामुळे त्याचे पालन होत नाही

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts