मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा पेडणेकरांनी सोमय्या यांना दिला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमच्या हिंदुत्वाबाबत (Hindutva) प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो, एवढंच राज ठाकरेंना (Raj Thackeray) सांगेन.
त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. पण आता जागच राहावं. जागते रहो. नाहीतर निवडणुका आल्यावर दोन महिने उठायचं अन् नंतर काहीच नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.
ज्या भोंग्यांना परवानग्या आहेत आणि जे प्रदूषण टाळत असतील त्यांना कोर्टानंही परवानगी दिलीय. मात्र, विनापरवाना भोंगे असतील तर परवानगी नाही. ही बाब सर्वच धर्मांना लागू राहील.
देशाची फाळणी पुन्हा कुणाला हवीय का? कोणत्याही गटाची मारामारी असो, सामाजिक सलोखा बिघडत असेल तर पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी असेही किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांना सांगितले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनाही इशारा दिला आहे. कोव्हिड काळात भ्रष्टाचार झाला असं जर किरीट सोमय्यांना वाटत असेल तर तो त्यांनी बाहेर काढावा. पण खरं बोलून काढावा.
कोव्हिड काळात मुंबई महापालिकेनं काय काम केलं हे लोकांना माहीत आहे. कसं काम केलंय हेही लोकांना महाीत आहे. कोणी तरी अजेंडा चालवायचा म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत.
खरं बोलून गैरव्यवहार झाला असेल तर बाहेर काढावा. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा अशा शब्दात त्यांनी सोमय्यांना इशारा दिला आहे.