अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नगर-पारनेर मतदार संघातील आ.निलेश लंके यांनी मनसेचे पारनेर तालुक्याचे पदाधिकारी अविनाश पवार यांच्यावर १ कोटी रुपयाचा दावा ठोकत त्यांना काल नोटीस पाठवली स्वतःला फकीर म्हणून घेणारे आ.निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकारी यावर अब्रूनुकसान केल्याप्रकरणी १ कोटीचा दावा ठोकला कसा? असा प्रश्न मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी आज रविवारी नगर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
मनसेचे नितीन भुतारे पुढे म्हणाले की, स्वतःला फकीर म्हणणारे पारनेर मतदारसंघातील आमदार लंके याच्या कडे 1 कोटी रुपये आले कुठून कोरोना परिस्थितीत आमदार लंके यांचे काम कौतुकास्पद आहे.
परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर असा दबाव टाकणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही पारनेर तालुक्यातील मनसेचे कार्यकर्ते अविनाश पवार यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहे अशी माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मनसेचे अविनाश पवार यांनी निलेश लंके यांच्या बाबत सोशल मीडियामध्ये बदनामी केल्याप्रकरणी ॲड.अरुण बनकर यांच्या मार्फत एक कोटी रुपये अब्रुनुकसानीचा दावाची नोटीस मनसेचे पारनेरतालुका पदाधिकारी अविनाश पवार यांना पाठवली आहे अशी माहिती भुतारे यांनी दिली.