मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget 2022) चालू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राइव्ह (Pen Drive) दिला होता. त्यावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दंड थोपटत बॉम्ब कुठे आहे असे विचारले आहे.
जयां पाटील (Jayant Patil) हे पाटबंधारे महामंडळाविषयी विधीमंडळात बोलत होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे कोणाला तरी हातवारे इशारे करून बोलत होते. धनंजय मुंडे यांचे हातवारे लगेच समजतील असे होते.
धनंजय मुंडे यांचे हातवारे असे म्हणत होते की, फडणवीस बॉम्ब फोडणार होते त्याचे काय झालं, तसेच बॉम्ब कुठे आहे असे हातवारे इशारे करून प्रश्न विचारत असल्याचे दिसून आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सत्ताधाऱ्यांविषयी आरोप करणारा पेनड्राईव्ह बॉम्ब विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यामुळे या पेनड्राईव्ह मध्ये काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर पोलिसांनी त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी २ तास चौकशी करत जबाब देखील नोंदवला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.
धनंजय धनंजय मुंडे यांनी हातवारे इशारे करत विरोधकांचा बॉम्ब कुठंय, बॉम्ब फोडायला हिंमत लागते असे इशारे करत दंड देखील थोपटल्याचे दिसले आहे. तसेच त्यांनी कॉलर देखील टाईट केल्याचे दिसले.