अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणार्या रोड लगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.
यामध्ये पोलिसांनी अशोक कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), भाऊसाहेब कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव),
परमेश्वर बाबासाहेब काळे, (तुर्काबाद खराडी, राजुरा, ता . गंगापूर, औरंगाबाद), जिभाऊ गजानन काळे (रा . गुट्टे वडगांव, औरंगाबाद), देवगन कागद चव्हाण (रा. हिंगणी), बाबूल कागद चव्हाण (रा . हिंगणी), कागद मारुती चव्हाण, बेबो कागद चव्हाण, मिजेश निजाम काळे,
औरंगाबाद या आरोपींना जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना
कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणारे रोडलगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अंधारात दबा धरून वाहने येण्याची वाट पहात असताना दिसली. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून जेरबंद केले.
या आरोपींकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक तलवार, एक लोखंडी कत्ती, लोखंडी कटावणी, एक सूरी, लाकडी दांडके, बॅटरी, मोबाईल असा एकूण 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी दरोड्याची तयारी करुन कोठेतरी दरोडा घालण्यासाठी एकत्र आलेले असल्याची खात्री झाल्याने पो.कॉ. संदीप विनायक चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.