ताज्या बातम्या

“शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही, अजून जन्माला यायचाय”

नागपूर : शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून विदर्भात चांगलाच जोर लावला जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विदर्भातील दौरे वाढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी नागपूरमधून (Nagpur) विरोधकांवर बाण सोडले आहेत.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. त्यांना आता पुढील 25 वर्षे विरोधी पक्षातच राहायचं आहे.

त्यामुळे आतापासून नागपूर महापालिकेची (Nagpur Municipal Corporation) तयारी करा, घरा घरात पोहचा आणि सांगा यापुढचा नागपूरचा महापौर (Mayor of Nagpur) शिवसेनेचाच असेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आता इथल्या थापा खूप झाल्या. आता फसवणूक होऊ देणार नाही. महिला आघाडीला रणरागिणी म्हणतात. त्या आता नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात उतरणार.

मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे. जे नागपूरकर म्हणतात, ते आता मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या प्रॉपर्टी मुंबईत आहे. नागपूरला वाऱ्यावर सोडलं. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

आता यांच्यावर इडी लागायला पाहिजे. आमच्यावर इडी लावतात, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. महापालिकेच्या घोटाळ्यावरून अनेकजण जेलमध्ये जातील. शिवसेना बेडर संघटन आहे.

कोणाच्या बापाला घाबरत नाही. कोणाच्या पाठीमागून वार करत नाही. नागपूर महापालिकेवर भगवा फडकेलं. तेव्हा बाळासाहेब वरून पुष्पवृष्टी करतील. आजही नागपुरात कोण आला रे कोण आला ही गर्जना घुमते.

नागपूर महापालिकेत शिवसेनेचे वाघ येणार आहे. कारण नागपुरातील लोकांचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार फोफावत आहे. भोंगे राजकारण चालू आहे. स्वतःची माणस नाहीत.

म्हणून भाड्याचे लोक घेतात. आता भोंगे लावणार आणि महागाईवर बोलणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. नागपुरात 572 लेआऊट अविकसित आहेत.

नागपूर महापालिकेत फक्त 25 वाघ पाठवा. तेच यांचा नरडा दाबतील. वाघ फक्त शिवसेनेचा असतो भाजपचा (BJP) नाही असेही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही नाव न घेता टोला लगावला आहे. ते दंगली घडवितात. हे कसे पळून जातात, आम्ही बघीतलं आहे. अयोध्येत मस्जिद पाडण्यात शिवसेनेचे वाघ होते. हे बाळासाहेबांनी सांगितलं. नागपूरच्या विमानतळावर उतरलो.

आणि सरळ इकडे आलो. हल्ली नागपूरचे लोक मुंबईत राहतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूरची माती अशी आहे की सुबुद्धी मिळते खरं आहे. पण नागपुरात राहून तुम्हाला सुबुद्धी आली नाही.

म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं. शिवसेनेसोबत होते. सत्तेत होते. मात्र तसं झालं नाही. वीट यावं अशा काही गोष्टी नागपुरातून घडतात असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Recent Posts