अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-बयाच्या पंचेचाळिशीनंतर आपल्या शरीरात अनेक बदल सुरू होतात. सर्वांत जास्त परिणाम त्वचा, आरोग्य आणि क्षमतेवर पडतो.
आरोग्यासंबंधी समस्यांमध्ये केस पातळ होणे, दातांमध्ये खराबी, हाडांमध्ये ठिसूळपणा, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, मेटाबॉलिज्मची कमतरता, हृदय कमकुवत होणे, अशा समस्या वाढू लागतात.
एकूणच या वयानंतर शरीराचे डी-जनरेशन सुरू होते. याला मेल मेनोपॉझ वा एंडरोपॉझही म्हणू शकता. यामुळे वयाच्या ४५ नंतर लाइफस्टाइलमध्ये बदल करून पौष्टिक आहाराच्या मदतीने स्वत:ला सुदृढ व तरुण ठेवता येऊ शकते. पंचेचाळिशीजंतर शरीरात होणारे मोठे बदल व सुरक्षेच्या पद्धती
उंची १ ते ३ इंचांपर्यंत कमी होऊ शकते : – पेशींची क्षती वेगाने सुरू होते व हाडांचे घनत्व घटू लागते. या वयानंतर उंची दर दहा वर्षांत १ सेंमी. कमी होते.
आठवड्यातून ४ दिवस वेट एक्सरसाइज : – वेट, रजिस्टेंस एक्सरसाइज हाडांसाठी उत्तम असतो. हा ग्रॅव्हिटी विरुद्ध काम करण्यासाठी मजबूत करतो. हाडे मजबूत होतात.
४00 एमएलपर्यंत रक्त कमी पंप होते : – हृदयाचे ठोके दर मिनिटाला ६0 पेक्षा कमी पडू लागतात. दर दशकानंतर रक्तपंपिंगची क्षमता ५ ते १0% कमी होत जाते. पंचविशीत हृदय २.४ लिटर रक्त पंप करते, तर पंचेचाळिशीत ते कमी होऊन २ लिटर राहते.
३0 मिनिटे कार्डियो : – २२0 मधून सध्याचे वय वजा करून मॅक्झिमम हार्ट रेट जाणू शकता. याच्या ८0% क्षमतेने आठवड्यातील ४ दिवस ३0 मिनिटे कार्डियो करा.
मेटाबॉलिज्म : – आरामाच्या अवस्थेत जी कॅलरी बर्न होत असते तिला आरएमआर म्हणतात. काम करण्यात जी कॅलरी बर्न होते तिला एनईटी म्हणतात. या क्रियांच्या माध्यमातून बर्न होणारी कॅलरी १0 ते ३0% पर्यंत कमी बर्न होते.
डिनरनंतर १५ मिनिटे अवश्य चालावे : – जरी आपण जास्त एक्सरसाइज करीत नसाल, तरी डिनरनंतर १५ मिनिटे अवश्य वॉक करायला हवा. मेटाबॉलिज्म सुधारेल.
मेंदूचे वजन ५%पर्यंत घटू लागते : – चाळिशीनंतर मेंदूचे वजन दर दहा वर्षांत सुमारे ८५% कमी होऊ लागते. न्यूरॅन्समधील कनेक्शन कमी होऊ लागते. रक्तप्रवाह कमी होतो. नवे नाव आठवण्यास, शब्द रिकॉल करण्यास अडचण येते.
पंचेंद्रियांचा भरपूर वापर करा : – उत्तम स्मरणशक्तीसाठी सर्व इंद्रिये डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा यांचा वापर करायला हवा. हे आपल्या भावनांशी निगडित असतात.