ताज्या बातम्या

Toyota Urban Cruiser Hyryder : फॉर्च्युनरच का? निम्म्या किमतीत ‘ही’ SUV देत आहे जबरदस्त मायलेज, तुम्हाला बसेल धक्का

Toyota Urban Cruiser Hyryder : बाजारात सध्या फॉर्च्युनरचा दबदबा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. फॉर्च्युनरची किंमत जास्त असल्यामुळे काहींना ती विकत घेता येत नाही. त्यामुळे निराश होऊ नका. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण तुम्ही आता फॉर्च्युनर नाही तर टोयोटाची आणखी एक कार विकत घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अर्ध्या किमतीत ही SUV विकत घेऊ शकता. यात तुम्हाला फॉर्च्युनरसारखी मजा येईल. तुम्ही आता अर्बन क्रूझर Hyrider खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनीने या बेस मॉडेलमध्ये अलॉय व्हील आणि म्युझिक सिस्टीम वगळता सर्व आवश्यक फीचर्स दिली आहेत. वरील 12 लाख रुपयांचा सेगमेंट Hyundai Creta, Kia Seltos आणि Tata Harrier सारख्या SUV ने भरलेला असून तुमच्यासाठी आता Hyrider हा एक चांगला पर्याय आहे कारण ती टोयोटा-ब्रँडेड SUV आहे जी Creta आणि Seltos हून जास्त प्रशस्त आहे.

जाणून घ्या किंमत आणि मायलेज

खरं तर मार्केटमध्ये टोयोटा अर्बन क्रूझर Hayrider चे चार प्रकार आहेत – E, S, G आणि V. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10.48 लाख रुपये तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19.49 लाख रुपये इतकी आहे. ही SUV तीन इंजिन पर्यायांमध्ये येते: निओ ड्राइव्ह, सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक तसेच सीएनजी. या SUV ला 19.39 kmpl ते 27.97 kmpl चा मायलेज मिळत आहे, जे मारुती ग्रँड विटारा वगळता त्याच्या सेगमेंटमधील इतर SUV हून जास्त चांगला आहे.

जाणून घ्या फीचर्स

जर या टॉप व्हेरिएंटच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, हवेशीर फ्रंट सीट्स, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, अॅम्बियंट लाइटिंग तसेच पॅडल शिफ्टर्स यांसारखी फीचर्स दिली आहेत. हे हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरामिक सनरूफसह येतात. तसेच कंपनीने वापरकर्त्यांसाठी यामध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा उपलब्ध करून दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts