General Knowledge 2023 : रेल्वेचा प्रवास करत असताना अनेक विहंगम दृष्य पाहता येतात. त्यामुळे रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरतो. पण रेल्वेच्या रुळाखाली दगडांची खडी का पसरलेली असते, याबाबत फारसं कधी जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही.
पण सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधले. जेव्हा ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपन निर्माण होतात. त्यामुळे रुळ वेगळे होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी दोन रुळांच्या मध्ये खडी किंवा लहान आकाराचे दगड टाकले जातात.
याला तांत्रिक भाषेमध्ये ‘ट्रॅक बलास्ट’ असे संबोधण्यात येते. हे मूलतः ट्रॅक बेड अर्थात एक प्रकारची खडीची गादी तयार करते की ज्याच्यावर ‘स्लीपर’ ठेवलेले असतात. आता स्लीपर म्हणजे काय ? तर लाकडी किंवा सिमेंट कॉक्रिटपासून तयार केलेली आयताकृती बीम.
ही बीम रेल्वेच्या रुळांना काटकोनामध्ये छेदते. रुळावरून रेल्वे जात असताना रुळ दबतात पण गाडी गेली की ते पूर्ववत आहे त्या जागेवर आणण्याचे काम या खडीमुळे बीम करते. म्हणजे रेल्वे जात असताना बसणारे धक्के ही खड़ी शोषून घेते.
याबरोबरच पावसाचे पाणी निचरा करण्यास या खडीची मदत होते. खडी नसेल तर रुळ तुटणे, मोठा आवाज येणे, रुळाखाली अथवा त्याभोवताली वनस्पती अथवा गवत उगवू शकते,
त्यामुळे रुळाखालील जमीन भुसभूशीत होऊन रेल्वे रुळावरून घसरून एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून रेल्वेच्या रुळाखाली किंवा रुळाच्या सभोवताली खडी पसरली जाते.