अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना राजकारणाचा पाराही चढला आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचं चित्र आहे.
देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात या इंजेक्शनचे वाटप केले जात आहे, हे राजकारण नाही का ? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता.
त्यावरून “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
‘गुजरातमध्ये भाजपने रेमडेसिवीर चोरुन आणले होते का? असा सवाल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी विचारला होता.
आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरातल्या कार्यकर्त्यांना रेमडेसिवीर दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतं आहे.
आता नवाब मलिक रोहित पवारांना “इंजेक्शन कुठून चोरुन आणलं”, असे विचारणार आहेत का ? मलिक हे खरंच निष्पक्ष असतील तर ते रोहित पवारानाही जाब विचारतील.
एव्हढेच नाही तर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत ते सरकारला सांगतील का, याबाबतचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले पाहिजर,
अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड,
सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीकड़ून देण्यात आली आहे.