ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? विखे पाटलांचा सरकारला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- राज्यात महावितरण प्रशासनाकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुली सुरू आहे. या मोहिमे विरोधात भाजपकडून आंदोलने होते आहेत.

यातच शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले आहे. या मद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली. विखे पाटील म्हणाले की, वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले.

शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून आघाडी सरकार काही धडा घेणार आहे का? राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? असा सवाल विखेंनी केला.

तसेच पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत वाटेदार असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना भले मोठे आश्वासनं दिले होते.

पण राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही कमी झालेल्या नाहीत, आता तर चक्क वीज तोडणीला कंटाळून सुरज जाधवने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

महावितरण कर्जबाजारी झाल्याचे सांगत पठाणी वसुली करत आहे. त्यामुळे शेतकरी वेठीस धरला जातोय. आधीच नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा त्रस्त आहे.

बळीराजाला शेतातील पिकाला पाण्याची जोड मिळाल्यास त्याला या संकटातून बाहेर निघण्यास मदतच होणार आहे. ऊर्जा विभागाने वीज जोडणी तोडण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts