Maharashtra News:कोरोनाच्या XBB व्हेरियंटमुळे भारतीयांची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी या व्हेरियंटमुळे पुन्हा करोनाची लाट येऊ शकते, असा इशारा दिला जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
त्यामुळे दिवाळीत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिअंटचे १८ पेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
त्यामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे ३००पेक्षा अधिक उपप्रकार आहेत. सध्या मात्र XBB व्हेरियंट अधिक धोकादायक आहे. XBB व्हेरियंटमुळं रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
तसंत, अँटीबॉडीजदेखील त्यावर परिणाम करत नाही. त्यामुळं XBB या व्हेरियंटमुळं काही देशात संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं देशात करोनाची नवी लाटही येऊ शकते, असे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
XBB व्हेरियंट अधिक संसर्गजन्य होत आहे. यावर मात करण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्यावेळी लोकांनी मास्क वापरावा, असे आवाहन केले आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटसारख्या बीएफ.७ आणि एक्सबीबी व्हेरियंटचा अनेक देशात फैलाव होत आहे. अमेरिकेत नव्या रुग्णांमध्ये जगभरात ७६.२ टक्के रुग्ण आढळले होते.
सध्या जगभरात करोना व्हेरियंट वेगाने पसरत आहेत. तीन व्हेरियंटचा धोका अधिक पाहायला मिळतो. जगभरात BF.7, XBB आणि BA.5 हे तीन व्हेरियंट वेगाने पसरत आहेत. नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.