अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती.
त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात हिराताई बडे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची शेती आहे.
त्या रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्या होत्या, त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.