World Cup 2011 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. एक दोन नाही तर एकूण 28 वर्षानंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. त्या पूर्वी 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.
आजही 2011 साली झालेला भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला सामना अनेकजण विसरले नाहीत. परंतु अनेकांना भारताला विश्वचषक जिंकून देणारे ते खेळाडू सध्या काय करतात असा प्रश्न पडला आहे. जाणून घेउयात याबाबत सविस्तर माहिती.
भारताने वर्ल्ड कप 2011 मध्ये उत्तम गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 274 धावांत आटोपला होता. यामध्ये भारताच्या स्टार खेळाडूंनी म्हणजेच झहीर खान आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करत असताना भारताकडून गौतम गंभीरने 97 धावा तर धोनीने 91 धावा करत 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. भारताला यानंतर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकता आला नाही.
काय करतात 11 सुपरस्टार खेळाडू ?
वर्ल्ड कप जिंकून देणारे ते 11 सुपरस्टार खेळाडू कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे ते 11 खेळाडू सध्या काय करतात.
1. वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग अर्थातच वीरू पाजी कधी कॉमेंट्री करतात, तर कधी ट्विटरवर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.
2. सचिन तेंडुलकर
क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असणारा सचिन तेंडुलकर आजही भारतासाठी ‘देवा’पेक्षा काही कमी नाही. तो सतत जाहिरातींमध्ये दिसत असून वीरूप्रमाणे तो कधी कधी लीजेंड्स लीग खेळतो. तसेच मास्टर ब्लास्टर सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो.
3. गौतम गंभीर
क्रिकेट ते राजकारण हा प्रवास काही नवीन नाही. गौतम गंभीरनेही तोच मार्ग निवडला असले तरी त्याने अजूनही क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केले नाही. पूर्व दिल्लीतून खासदार निवडून आल्यानंतरही गौतम अजूनही क्रिकेट खेळत आहे. इतकेच नाही तर तो आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉरही आहे.
4. विराट कोहली
विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू जो अजूनही ब्लू जर्सी घालून खेळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर 75 शतके झळकावणारा विराट सध्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे.
5. एम एस धोनी
एम एस धोनी हा सध्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध खेळत असताना 7 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. इतकेच नाही तर त्याच्या एका षटकाराची भोजपुरी कॉमेंट्री खूप व्हायरल झाली आहे.
6. युवराज सिंग
तुम्ही जे काही कराल, ते ‘लाइव्ह लाइफ, किंग साइज’ या ब्रीदवाक्याचे पालन करणारे युवराज सिंग करतो. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा तो एक भाग होता. मात्र या स्पर्धेनंतर लगेचच, त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कर्करोगाच्या ट्यूमरवर मात करून शानदार पुनरागमन केले. जाहिरातींशिवाय सध्या तो ‘YouWeCan’ ब्रँडचे प्रमोशन करत आहे.
7. सुरेश रैना
भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू सुरेश हा रैना सध्या IPL 2023 मध्ये Jio सिनेमासाठी कॉमेंट्री करताना दिसत आहे. तसेच तो कधी-कधी चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.
8. झहीर खान
भारतीय संघाला अजूनही झहीर खाननंतर असा डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला नाही. झहीर सध्या आयपीएल 2023 मध्ये जिओ सिनेमासाठी कॉमेंट्री करताना दिसत आहे. इतकेच नाही तर तो मुंबई इंडियन्समध्ये जबाबदारीही सांभाळत आहे.
9. मुनाफ पटेल
मुनाफ पटेलची कारकीर्द दुखापतींमुळे घसरली. तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकात त्याने आपली भूमिका चोख बजावली. सध्या तो ग्लोबल पॉवर क्रिकेट लीगचा हिरो म्हणून काम करत असून यापूर्वी तो बडोदा क्रिकेट असोसिएशनचे गोलंदाजी प्रशिक्षकही होता.
10. श्रीशांत
भारतीय संघात श्रीशांतपेक्षा जास्त वादग्रस्त कारकीर्द कोणाची झाली नसेल. त्याच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर त्याच्यावर क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती. जरी 2015 मध्ये तो निर्दोष सिद्ध झाला असला तरी तो भारताकडून खेळू शकला नाही. सध्या तो हरभजन सोबत आयपीएल 2023 मध्ये स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करत आहे.