अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, शहरात आणखी ३ ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर केले जाणार आहेत.
त्यामुळे एकूण कन्टेन्मेंट झोनची संख्या २२ वर पोहोचली असून, कोरोनावर उपचार घेणाऱ्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३३६ झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.२२) विक्रमी ८५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामध्ये अहमदनगर शहरातील रुग्णांची संख्या २९१ एवढी आहे.
त्यामुळे शहरात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने यापूर्वी शहरात १९ ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेले असून, रविवारी ज्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले.
अशा सावेडी परिसरातील प्रसाद चेंबर्स, बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा परिसर व सिद्धार्थनगर या ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.