Oppo Reno 7 Pro : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांना खूप स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. होय, कारण आता Oppo Reno 7 Pro या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 47,990 रुपये इतकी आहे.
परंतु, त्यावर ऑफर मिळत असल्याने तो तुम्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीचा हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच झाला आहे. लाँच झाल्यापासून तो इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला टक्कर देत आहे. जर तुम्ही तो खरेदी केला तर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
जाणून घ्या ऑफर
या फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 47,990 रुपये आहे. परंतु तुम्ही हा फोन 27 टक्के डिस्काउंटसह 34,999 रुपयांना लिस्ट केला आहे. इतकेच नाही तर फोनद्वारे IDBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10 टक्के सूट (जास्तीत जास्त 500 रुपये) उपलब्ध असणार आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येईल.
या फोनसोबत 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असून जुन्या फोनची देवाणघेवाण करून तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरचे मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या आणि कंपनीच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.
काय आहे स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा
Oppo Reno 7 5G ला Android 11 आधारित ColorOS 12 मिळत आहे. या फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला असून ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आणि 90Hz रीफ्रेश दर आहे. यात डिस्प्लेसह संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 उपलब्ध आहे.कंपनीच्या या फोनमध्ये MediaTek 1200-Max प्रोसेसर, 8 GB RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
या फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX766 सेन्सर, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे तर तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. तसेच यात सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरासोबत कलर टेंपरेचरसाठी सेन्सरही दिला आहे. हा फोन 65W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4500mAh ड्युअल सेल बॅटरी पॅक करतो.
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही दिला आहे.