ताज्या बातम्या

Airtel : भारीच की! कंपनी देत आहे अनलिमिटेड 5G डेटा मोफत, असा घ्या फायदा

Airtel : देशात एअरटेलने आता आपली 5G सेवा सुरु केली आहे. ही सेवा अजून सर्व शहरात सुरु झाली नसली तरी ती काही शहरात ती सेवा सुरु आहे. लवकरच संपूर्ण देशभर कंपनी आपली 5G सेवा सुरु करणार आहे. या कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे.

कंपनी सतत नवनवीन आणि ग्राहकांच्या बजेटनुसार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. अशातच आता कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मोफत देत आहे. परंतु, जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत.

हे लक्षात ठेवा की Truly Unlimited Airtel 5G प्लॅन सक्षम करण्यासाठी काही अटी आहेत. सगळ्यात अगोदर, तुमच्याकडे 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असावा. तुम्ही Airtel Thanks अॅपच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनवर 5G चालत आहे की नाही हे तपासू शकता. तसेच, Airtel ची 5G कनेक्टिव्हिटी फक्त निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे आणि ऑफरचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही Airtel च्या 5G नेटवर्कच्या रेंजमध्ये असाल. सध्या, Airtel 5G Plus चा लाभ देशातील 250 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहे.

एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करणे गरजेचे

जर वर नमूद केलेल्या सर्व अटी तुम्हाला लागू होत असतील तर, Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन My Airtel अॅप डाउनलोड करा. हे अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करावे लागणार आहे. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर दिसणार्‍या ‘अनलिमिटेड 5G डेटा’ बॅनरवर टॅप करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑफरचा लाभ मिळेल. यानंतर तुम्ही स्ट्रीमिंग, डाऊनलोड आणि अपलोडिंगसाठी अमर्यादित डेटा मोफत मिळवू शकता.

करावा लागणार इतका रिचार्ज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एअरटेलने मोफत अमर्यादित 5G डेटा देण्यासाठी एक अट घातली असून आता ग्राहकांच्या नंबरवर किमान 249 रुपयांचा सक्रिय प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन असावा. जर तुम्ही Rs 455 किंवा Rs 1799 च्या प्लॅनसह रिचार्ज केला असल्यास तर तुम्हाला Airtel कडून अमर्यादित मोफत 5G डेटाचा लाभ मिळणार नाही. तर कंपनीच्या सर्व पोस्टपेड प्लॅनची ​​किंमत 249 रुपयांपेक्षा जास्त असून म्हणजेच प्रत्येक पोस्टपेड प्लॅनसह तुम्ही ऑफरसाठी पात्र आहात.

डेटा शेअर करता येणार नाही

नवीन ऑफरमध्ये काही मर्यादा असून त्यातील सर्वात मोठी म्हणजे डेटा शेअरिंगवरील असणारे निर्बंध. या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर तुम्हाला हवा तसा 5G मोबाइल डेटा मोफत वापरू शकता, मात्र तो इतर उपकरणांसह शेअर करता येणार नाही. याचाच असा अर्थ की तुम्हाला मोबाईल हॉटस्पॉट चालू करताना पीसी, लॅपटॉप किंवा टॅब्लेटच्या मदतीने 5G इंटरनेट वापरता येणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Airtel

Recent Posts