Xiaomi 13 Pro Discount : भारतीय बाजारात Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपला Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा सर्वात आलिशान आणि महागडा फोन आहे.
या कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. अनेकांना या फोन खरेदी करावा असे वाटते. परंतु या फोनची किंमत खूप जास्त असल्याने अनेकांना खरेदी करता येत नाही. तुम्ही आता हा फोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता.
Mi.com वर दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro 89,999 रुपयांऐवजी 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा फोन तुम्ही विशेष बोनस अंतर्गत, 5,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत 69,999 रुपयांपर्यंत कमी होईल. हे लक्षात घ्या की ही सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल, स्थिती आणि तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंजची उपलब्धता यावर अवलंबून असेल.
जाणून घ्या खासियत
या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर Xiaomi 13 Pro 6.73-इंचाच्या 2K OLED डिस्प्लेसह तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. हा फोन डॉल्बी व्हिजन आणि HDR10 ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंगसह येतो. तसेच या फोनचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटने सुसज्ज असून फोन MIUI 14 वर काम करतो, जो Android 13 वर आधारित आहे. महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये वापरकर्त्यांना डॉल्बी आवाज मिळतो, जो सहसा टीव्हीवर ऐकू येतो.
Xiaomi 13 Pro च्या भारतीय व्हेरियंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा 1-इंचाचा सोनी IMX989 प्राथमिक सेन्सर, 50-मेगापिक्सलचा फ्लोटिंग टेलीफोटो सेन्सर आणि 50-मेगापिक्सेलचा वाइड-एंगल सेन्सर तुम्हाला पाहायला मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला या फोनमध्ये सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळेल.
स्टोरेजचा विचार केला तर Xiaomi 13 Pro हा फोन 12GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह खरेदी करता येईल. कंपनीच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये ग्राहकांना 120W हायपर चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट असणारी 4,820mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.