Xiaomi Sale : दिग्ग्ज स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या वेबसाइटवर Xiaomi फॅन फेस्टिव्हल 2023 सुरु केला आहे. तुम्ही आता या फेस्टिव्हलमध्ये Redmi 12C आणि Redmi Note 12 हे दोन स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत सहज खरेदी करू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेल फक्त 11 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे स्मार्टफोन खरेदी करा. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर जावे लागणार आहे.
कंपनीच्या Redmi 12C 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये येतात. Redmi Note 12 मध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय मिळू शकेल. त्याची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत पहिली तर त्याची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.
जाणून घ्या काय आहे ऑफर?
जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच इतर ब्रँडच्या स्मार्टफोनवर 1000 रुपयांपर्यंत देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की हा सेल 6 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे.
जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइट आणि Flipkart द्वारे या दोन्ही Redmi स्मार्टफोन्सवर चालू असणारी सूट खरेदी करण्यास सक्षम असू शकता. Xiaomi फॅन फेस्टिव्हल सेलमध्ये, Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर Redmi Note 12 वर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर एक हजार रुपयांची झटपट सवलत देण्यात येत आहे.
जर तुम्ही ऑफर्सवर नजर टाकली तर कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर खूप मोठी सवलत देत आहे. Redmi 12C स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे. समजा तुम्ही Flipkart द्वारे खरेदी केला तर, तुम्हाला रु. 1600 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आणि ICICI बँक कार्ड्सवर रु. 1000 ची सूट मिळू शकते.