Xiaomi Smartwatch : तरुणाईमध्ये स्मार्टवॉचची क्रेझ निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या हातात आज तुम्हाला स्मार्टवॉच पाहायला मिळेल. मागणी जास्त असल्याने वेगवेगळ्या कंपन्या आता आपले शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टवॉच लाँच करू लागल्या आहेत.
अशातच आता शाओमीने देखील आपले नवीन स्मार्टवॉच Xiaomi Black Shark 1 जागतिक बाजारात लाँच केले आहे. यात तुम्हाला 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ, ब्लूटूथ कॉलिंग यांसारखे शानदार फीचर्स पाहायला मिळेल. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.
जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या स्मार्टवॉचमध्ये 466×466 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले देत असून जो 600 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. तसेच या स्मार्टवॉचचा रिफ्रेश दर 60Hz इतका आहे. हे ऑलवेज ऑन डिस्प्ले 100 पेक्षा जास्त स्मार्टवॉचचे चेहरे ऑफर करतो.
जे वापरकर्ते त्यांच्या मूड आणि शैलीनुसार सेट करता येईल. इतकेच नाही तर कंपनी या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देत आहे. यात ENC आणि सिग्नल प्रोसेसिंग मायक्रोफोन असल्याने जो वापरकर्त्यांना स्पष्ट कॉलिंग अनुभव देईल.
Xiaomi Black Shark S1 स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह येते. यात देण्यात आलेली बॅटरी खूप पॉवरफुल असून हे एका चार्जवर सामान्य वापरात तब्बल 10 दिवस टिकते असा दावा कंपनीने केला आहे. अचूक GPS ट्रॅकिंगसाठी यामध्ये शार्क वेअर अॅप देण्यात आले आहे.
कॅमेरा कंट्रोल, कॅल्क्युलेटर, स्टॉपवॉच आणि मेसेज नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स यात दिली आहेत. हे स्मार्टवॉच तुम्हाला केवळ काळ्या रंगाच्या पर्यायात खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 50 डॉलर्स इतकी आहे. कंपनी सध्या ते अमेरिका आणि युरोपमध्ये पाठवत असून तुम्ही तर शार्कच्या वेबसाइटवरून ऑर्डर करू शकता.