Xiaomi TV S Pro : घरबसल्या घेता येणार थिएटरची मजा! ‘इतक्या’ स्वस्तात मिळतोय Xiaomi चा 85 इंच टीव्ही

Xiaomi TV S Pro : भारतीय बाजारातील Xiaomi ही सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी बाजारात आपले अनेक वस्तू लाँच करत असते. कंपनीचे जसे स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत तसे कंपनीचे स्मार्टटीव्ही देखील खूप प्रसिद्ध आहेत.

कंपनी सतत आपले स्मार्टटीव्ही लाँच करत असते. अशातच आता कंपनीने जबरदस्त फीचर्स असणारा एक टीव्ही लाँच केला आहे. कंपनीचा हा 85 इंचाचा स्मार्ट टीव्ही आहे. महत्त्वाचे म्हणजे हा टीव्ही प्री-ऑर्डरवर 23 हजार स्वस्तात मिळेल.

तुम्ही आता Xiaomi TV S Pro आता 85-इंच स्क्रीन आकारात खरेदी करू शकता. कंपनीने यामध्ये 4K रिझोल्यूशन, 2400 nits पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटसह मिनी एलईडी डिस्प्ले पॅनेल दिला आहे. कंपनीचा हा शक्तिशाली स्मार्टटीव्ही 1,440 हाय-एंड बॅकलाइट विभाजने आणि एक लाइट सेन्सर ऑफर करेल.

जो आसपासच्या वातावरणानुसार आपोआप ब्राइटनेस समायोजित करेल. Xiaomi TV S Pro हा 85 इंच टीव्ही फुल-स्टॅक कलर इंजिन, डायनॅमिक क्लॅरिटी इंजिन, कॉन्ट्रास्ट एन्हांसमेंट इंजिन, कलर अ‍ॅक्युरेसी इंजिन इ. सारख्या अनेक तंत्रज्ञानांना सपोर्ट करेल. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन अॅटमॉस सामग्रीला सपोर्ट करेल.

ड्युअल 15W स्टीरिओ स्पीकर

ऑडिओसाठी, Xiaomi TV S Pro हा टीव्ही ड्युअल 15W स्टीरिओ स्पीकरने सुसज्ज असून जे 30W ध्वनी आउटपुट देतात. हे व्हॉईस कमांडद्वारे नियंत्रित केले जातात. याच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर Xiaomi TV S Pro या टीव्हीमध्ये क्वाड-कोर A73 प्रोसेसर दिला आहे.

स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे. हा टीव्ही नवीन HyperOS वर काम करतो. या टीव्हीवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांत WiFi 6, दोन HDMI 2.1 पोर्ट, एक HDMI 2.0 पोर्ट, USB 3, USB 2, एक इथरनेट पोर्ट आणि NFC रिमोट कंट्रोल दिला आहे.

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

किमतीचा विचार केला तर Xiaomi TV S Pro 85 ची किंमत CNY 9,999 (अंदाजे 1 लाख 13 हजार रुपये) इतकी आहे. प्री-ऑर्डर करणारे ग्राहक CNY 2,000 (अंदाजे रु. 23 हजार) सवलत कूपनसाठी पात्र असणार आहे. पहिला सेल 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे हे लक्षात ठेवा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts