ताज्या बातम्या

Xiaomi smartphone : 10 हजारांच्या सवलतीत खरेदी करता येतोय Xiaomi चा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन, कुठे मिळत आहे संधी पहा

Xiaomi smartphone : अनेकांना बजेट कमी असल्यामुळे शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. परंतु, तुम्ही आता तुमच्या आवडीचा स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. Xiaomi ही देशातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे.

आता हीच कंपनी आपल्या Xiaomi 13 Pro या स्मार्टफोन खूप मोठी सवलत देत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 79,999 रुएए इतकी आहे. मात्र हा स्मार्टफोन तुम्ही आता एकूण 10 हजारांच्या सवलतीत खरेदी करू शकता. ही सुवर्णसंधी कुठे मिळत आहे? त्याचे फीचर्स काय आहेत? जाणून घ्या.

नवीन स्मार्टफोनची विक्रीसाठी Xiaomi ने ICICI या बँकेसोबत भागीदारी केली असून ग्राहकांना फोन खरेदीवर 10,000 रुपयांची त्वरित सूट देण्यात येत आहे. कंपनी या स्मार्टफोनवर विशेष एक्सचेंज बोनस देत असून आता जर तुमच्याकडे जुना Xiaomi फोन असेल तर तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ दिला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Xiaomi नसलेल्या फोनवरही एक्सचेंज ऑफरसह सूट दिली जाणार आहे.

असा खरेदी करता येणार स्मार्टफोन

Xiaomi 13 Pro फक्त एका रॅम आणि स्टोरेज प्रकारात लॉन्च केला असून यात 12GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनची किंमत 79,999 रुपये ठेवली आहे. कंपनीचा हा देशातील Xiaomi चा आतापर्यंतचा सर्वात जास्त महागडा फोन आहे. ICICI बँक कार्ड्ससह, त्यावर 10,000 रुपयांची सूट मिळत असल्याने तो आता 69,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकतो.

इतकेच नाही जर तुमच्याकडे जुना Xiaomi किंवा Redmi ब्रँडेड स्मार्टफोन एक्सचेंजसाठी असेल तर तुम्हाला 12,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ मिळेल. तर Xiaomi नसलेल्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजच्या बाबतीत, 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन तुम्ही सिरॅमिक व्हाइट आणि सिरेमिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स

5G सपोर्ट शिवाय, शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये Android 13 वर आधारित MIUI 14 आहे. यात 50MP रुंद, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो लेन्स आणि 32MP सेल्फी कॅमेरासह तिहेरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीच्या या फोनचा 6.7-इंचाचा 2K वक्र डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेट ऑफर करतो.

डिस्प्लेला डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ साठी सपोर्ट दिला आहे. या फोनची 4,820mAh बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी समर्थित आहे. यात रिव्हर्स चार्जिंग फीचर उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts