अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- राज्यातील अनेक भागात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने विविध निर्बंध घातले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावरगाव येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानची पौष अमावस्यानिमित्त दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पौष अमावस्या उत्सवाबाबत उत्सव समितीच्या सदस्यांची सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि३०जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांसाठी व यात्रेकरूंसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यात्रा काळात भाविकांची गर्दी लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
कोरोना साथीचा फैलाव होवू नये, यादृष्टीने यात्रा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.