मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे.
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) बोलताना म्हणाले, हा विजय आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला आहे.
राज्यातील सत्ता बदलावर मी बोलणार नाही, मात्र त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील बोलतील. असेही शेलार म्हणाले आहेत.
त्याचबोरबर नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर देखील सत्ता बदल होणार आणि भाजपची निर्विवादपणे सत्ता येणार असा छातीठोक दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत यांनी आज कबुल केलं आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी नोटांचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनीही आजच्या निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे.
विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीनं राज्य करायला शिकलं पाहिजे.