ताज्या बातम्या

योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता; तर, शपथविधी सोहळा होळीनंतर होणार

नवी दिल्ली : नुकतेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपला पंजाब वगळता बाकी चार राज्यांमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला (Bjp) मोठे यश मिळाले आहे. ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह २७३ जागा जिंकल्या आणि पूर्ण बहुमत मिळवले आहे.

नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपालांकडे (Governar) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आणि आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटण्याची शक्यता आहे.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेण्यासाठी रविवारी म्हणजेच उद्या दिल्लीत येण्याची शक्यता आहे.

तसेच योगी यांचा उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार असल्याची शक्यता आहे. भाजपसाठी हा उत्तर प्रदेश निवडणुकीत दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी मानला जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election Result) ४०३ जागांवर निवडणूक निकाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह २७३ जागा जिंकल्या आहेत.

यामध्ये भाजपने २५५ जागा जिंकल्या, तर अपना दल १२ आणि निषाद पक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने १११ जागा जिंकल्या आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts