Investment : सध्याच्या काळात पैशाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या चांगल्या भविष्यासाठी अनेकजण कशात ना कशात गुंतवणूक करत असतो. परंतु, अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. अनेकांना या योजनेबद्दल माहिती नसते.
त्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. काही योजना अशा आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत आहे. तुम्हीही भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजना कोणत्या आहेत? त्यात किती परतावा मिळत आहे? त्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या.
दरम्यान सोन्यात गुंतवणूक करण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची किंमत. कारण सोन्याचे दर वेळोवेळी वाढतच असतात. त्यामुळे जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी वेळेत खूप चांगला परतावा मिळू शकतो.
तुम्हाला शेअर बाजारातील घसरणीच्या वेळी खरेदी केलेले सोने तुम्हाला जबरदस्त परतावा देऊ शकते. कारण जेव्हा जेव्हा स्टॉक कमी होतो तेव्हा तुमच्या सोन्याची किंमत वाढत जाते. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेले सोने तुम्हाला अशा वेळी चांगला परतावा देऊ शकते.
गोल्ड-ईटीएफ आणि गोल्ड फंड
तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही सोन्यात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता, एक म्हणजे गोल्ड ईटीएफ आणि दुसरे म्हणजे गोल्ड फंड आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुमचे सोने सुरक्षित होते तसेच जेव्हा सोन्याचे दागिने बनवले जातात तेव्हा ते कापले जात नाही. हे लक्षात घ्या की गोल्ड ईटीएफ हे सोने खरेदी करण्यासारखे आहे. तर, गोल्ड फंडात गुंतवणूक करणे म्हणजे थेट खाण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आहे. यामुळे तुमचे सोने बाजारातील चढ-उतारांपासून सुरक्षित राहते.
म्युच्युअल फंड
तसेच तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. यात परतावा चांगला मिळतो तसेच जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. परंतु जेव्हाही तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा नेहमी हे लक्षात ठेवा की अनुभवी व्यक्तीद्वारेच गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे. इतकेच नाही तर म्युच्युअल फंडातील जोखीम समजून घेऊनच गुंतवणूक करा, ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला चांगला परतावा मिळेल.