सध्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक फायद्याच्या अशा छोट्या म्हणजेच अल्प बचत गुंतवणूक योजना राबविण्यात येत असून या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूक सुरक्षित राहतेच.परंतु तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या खूप वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये गुंतवणूक करणे हे खूप फायद्याचे ठरताना आपल्याला दिसून येत आहे
व त्यामुळेच गुंतवणूकदारांकडून देखील पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामधील जर आपण पोस्टाची योजना पाहिली तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजेच एमआयएस योजना देखील एक महत्त्वाची योजना आहे व या योजनेत केलेली गुंतवणूक तुम्हाला प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्न देऊ शकते.
कसे आहे
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेचे स्वरूप?ही एक मुदत ठेव योजना असून यामध्ये तुम्ही नुसते व्याजाच्या माध्यमातून दर महिन्याला चांगला पैसा मिळवू शकतात. या योजनेमध्ये एकट्या व्यक्तीला आणि संयुक्त म्हणजेच दोन व्यक्ती मिळून देखील खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयुष्याच्या निवृत्तीनंतर तुम्हाला जर या योजनेतून निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या योजनेत खाते उघडू शकतात.
कारण संयुक्त खाते उघडले तर या योजनेत गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा असून योजनेच्या माध्यमातून अगदी घरबसल्या तुम्ही पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे देखील मिळवू शकतात. तुम्हाला या योजनेत एकरकमी ठेव ठेवावी लागते व पोस्ट ऑफिस कडून तुम्हाला प्रत्येक महिन्याला कमाई होत असते.
तुमचे जर सिंगल खाते असेल तर तुम्ही त्यामध्ये नऊ लाख रुपये ठेवू शकतात आणि संयुक्त खाते असेल तर पंधरा लाख रुपयांची रक्कम तुम्हाला जमा करता येते. या योजनेमध्ये सध्या 7.4% या दराने व्याज मिळत असून त्यामुळे जास्तीत जास्त ठेव ठेवली तर जास्तीत जास्त पैसा देखील तुम्हाला मिळतो.
तुम्हाला या योजनेत तुमची पत्नीच नाही तर तुम्ही तुमचा भाऊ किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्यासोबत संयुक्त खाते उघडता येते.परंतु पती-पत्नीची कमाई एकत्रित व एकाच कुटुंबाची असल्यामुळे अधिक फायदा मिळवायचा असेल तर पत्नीसोबत खाते उघडणे महत्वाचे असते व अशा प्रकारचा सल्ला देखील गुंतवणूक तज्ञांकडून दिला जातो.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून 5 लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम कशी कमवू शकता?
जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या योजनेत संयुक्त खाते उघडले व दोघं मिळून तुम्ही 15 लाख रुपये जर जमा केले तर या योजनेत सध्या मिळत असलेल्या 7.4% व्याजदराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये उत्पन्न मिळेल. प्रकारे तुम्ही एका वर्षामध्ये एक लाख 11 हजार रुपये कमवू शकतात.
या हिशोबाने जर पाच वर्षाच्या आकडेवारी काढली तर ती पाच लाख 55 हजार रुपये होते व अशा प्रकारे तुम्ही पाच वर्षात दोघं मिळून पाच लाख 55 हजार रुपये फक्त व्याजातून कमवू शकतात. समजा तुम्ही एकट्यानेच खाते उघडले असेल तर तुम्ही यामध्ये नऊ लाख रुपये जमा करू शकता व 7.4% या व्याजदराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याजापोटी पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील.
हे जर तुम्ही वर्षाला पकडले तर 66 हजार 600 रुपये व्याज होते. या हिशोबाने तुम्ही पाच वर्षात 3 लाख 33 हजार रुपये नुसते व्याजापोटी या योजनेतून मिळवू शकतात. या योजनेत खात्यावर ठेवलेल्या ठेवीवर मिळणारे व्याज प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या बचत खात्यात जमा केले जाते व पाच वर्षानंतर तुम्ही तुमची जमा केलेली रक्कम काढू शकतात.