अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- मुंबईच्या तरूणीने मात्र यामध्ये धक्कादायक कृत्य केलं आहे. या तरूणीमुळे तरूणांची पुरती झोप उडाली आहे.
सुरुवातीला नयनसूख देणारी ही तरूणी नंतर मात्र आयुष्यातील सारं सूखच हीरावून टाकते असा प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. मुंबईची असल्याची बतावणी करीत तरूणी व्हिडिओ कॉलकरून अश्लिल हावभावाने तरूणांना घायाळ करायची.
निर्वस्त्र होवून तरुणाला १५-२० मिनिटं बोलायला भाग पाडायची. यानंतर जे घडायचं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तरुणांनी अशा कुठल्याही कॉल्सला बळी पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहे.
या घटनेचा तपास केला असता पोलिसही हादरले आहेत. अधिक माहितीनुसार, तरुणी व्हिडिओ कॉलवर अश्लिल चाळे करून व्हिडिओ रेकॉर्ड करायची आणि त्यानंतर त्याचा वापर तरुणांना ब्लॅकमेक करण्यासाठी करायची.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धकमी देत पैश्याची मागणी करायची. ती ऐवढ्यावरच थांबली नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी करीत तरुणीने तक्रार दाखल केल्याचे सांगतात.
या साऱ्या प्रकाराने अनेक तरुण पुरते पसले आहेत. एकट्या गोंडपिपरीत अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचं बोललं जात आहे. बदनामीचा भितीने तरूणांनी पोलीसाकडेही पाठ फिरविली आहे.