अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- शनिवार-रविवारचा लॉकडाऊन शहरातील सर्व व्यापारी पूर्णपणे पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा.
अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. असे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
या विरोधात लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारुन सलग तिसऱ्या दिवशीही दुकाने उघडी ठेवली आहेत. नियम डावलून सुरू असलेल्या दुकानांचे पोलिसांनी शुक्रवारीही फोटो काढले. मात्र, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या बैठकिकडे लक्ष लागले आहे.