ताज्या बातम्या

Dish SMRT Stick : तुम्हीही तुमच्या जुन्या टीव्हीवर मोफत घेऊ शकता OTT चा आनंद, बसवा फक्त हे उपकरण

Dish SMRT Stick : सध्या OTT प्लॅटफॉर्मचा वापर खूप वाढला आहे. डिश टीव्ही आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असते. अशीच एक ऑफर डिश टीव्हीने आणली आहे. कंपनी आता आपल्या ग्राहकांना डिश एसएमआरटी स्टिक नावाचे उत्पादन देत आहे.

सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे हे उपकरण तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला जोडू शकता. या उपकरणाची किंमत 999 रुपये इतकी आहे. परंतु, ऑफरमुळे कंपनीचे हे उपकरण तुम्ही केवळ 599 रुपयात खरेदी करू शकता. 6 महीने FREE सर्विस मिळवू शकता.

किती आहे या स्टिकची किंमत?

डिश स्मार्ट स्टिकची किंमत रु 599/युनिट इतकी आहे. खरं तर या उत्पादनाची किंमत 999 रुपये इतकी आहे. परंतु, सध्या डिश टीव्ही ऑफर म्हणून ती फक्त 599 रुपयांना विकत आहे. प्रथमच वापरकर्त्यांना पहिल्या सहा महिन्यांसाठी स्मार्ट स्टिकसाठी कोणतेही जास्त पैसे द्यावे लागणार नाही. त्यानंतर, स्टिक वापरण्याची किंमत प्रत्येक महिन्याला २५ रुपये + कर येईल. डिश SMRT स्टिकसाठी कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही. कंपनी या उत्पादनासह यावर एकूण सहा महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे.

जाणून घ्या फीचर्स

डिश स्मार्ट स्टिक हे केवळ एक USB वाय-फाय डोंगल असून जे तुम्हाला OTT अॅप्स आणि त्यांच्या सामग्रीच्या जगात प्रवेश देण्यासाठी STB शी कनेक्ट केले जाते. याबाबत कंपनीने असे म्हटले आहे की जर एखाद्या वापरकर्त्याला ही सेवा वापरायची असल्यास, त्याला डिश स्मार्ट स्टिकद्वारे कोणत्याही उपलब्ध वाय-फाय नेटवर्कशी किंवा मोबाइल हॉटस्पॉटशी त्याचा/तिचा Dish NXT HD STB कनेक्ट करणे खूप गरजेचं आहे. स्मार्ट स्टिक एसटीबीच्या यूएसबी पोर्टसोबत जोडण्यात येते.

परंतु, हे लक्षात घ्या की या उत्पादनाद्वारे समर्थित Wi-Fi वारंवारता 2.4GHz इतकी आहे. 5 GHz वाय-फाय नेटवर्कसह कनेक्शनला समर्थन दिले असते तर ते जास्त चांगले झाले असते आणि वापरकर्त्यांना उच्च रिझोल्यूशनमध्ये सामग्री प्ले करण्यासाठी आणखी चांगली बँडविड्थ मिळू शकते.

कंपनीने अशी शिफारस केली आहे की डिश SMRT स्टिकच्या सर्वोत्तम अनुभवासाठी वापरकर्त्यांकडे 4 Mbps किंवा त्याहून जास्त स्पीडचे इंटरनेट कनेक्शन असावे. तसेच या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध अॅप्स मोफत असतीलच असे नाही. ZEE5, Docubay, Watcho, Hungama Play, AltBalaji Eros Now आणि इतर सारखे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना डिश SMRT स्टिकसह उपलब्ध असणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts