EPFO : अनेक नोकरदार व्यक्तींकडे पीएफ खाते आहे. जर तुमचेही पीएफ असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतीच EPFO कडून एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. आता तुम्हाला जास्त पेन्शन मिळू शकते.
जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. त्याआधी हे लक्षात ठेवा की उच्च निवृत्ती वेतनासाठी तुम्हाला अर्ज करत असताना काही मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागणार आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती..
सदस्य आणि नियोक्ता ईपीएस अंतर्गत संयुक्तपणे अर्ज करू शकणार असल्याचे या मार्गदर्शक तत्त्वात नमूद केले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन (सुधारणा) योजना 2014 कायम ठेवण्याचे सांगितले होते. तसेच 2014 मध्ये केलेल्या EPS रिव्हिजनमध्ये, पेन्शन पगाराची मर्यादा 6,500 रुपयांवरून सुमारे 15,000 रुपये प्रति महिना वाढवण्याचे म्हटले होते.
इतकेच नाही तर सदस्य आणि नियोक्ते यांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के योगदान देण्यास सांगण्यात आले होते.
त्यामुळे उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्यासाठी लवकरच ऑनलाइन सुविधा सुरू केली जाणार आहे. लोकांना याबाबत माहिती मिळावी यासाठी प्रादेशिक पीएफ आयुक्त हे सूचना फलक आणि बॅनरची मदत घेणार आहेत.
उच्च निवृत्ती वेतनासाठी येणाऱ्या प्रत्येक अर्जाची नोंदणी करण्यात येणार आहे. अर्जाचा पावती क्रमांकही दिला जाणार आहे. तसेच ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या EPFO कार्यालयात जावे लागणार आहे. तुम्हाला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जर संयुक्त अर्ज सादर केला तर तुम्हाला डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशनचा पर्याय निवडावा लागणार आहे.
पीएफ ते पेन्शन फंडामध्ये समायोजन करण्यासाठी, संयुक्त स्वरूपात कर्मचार्यांची संमती आवश्यक असणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, काही वेळाने तुम्हाला URL सांगितले जाणार आहे.