ताज्या बातम्या

भावा फक्त तुझीच हवा! युवा शेतकऱ्याने अवघ्या 22 गुंठ्यात मिरची पिकातून कमवले 9 लाख; वाचा ‘या’ नवयुवकाची यशोगाथा

Farmer succes story : शेती व्यवसायात (Farming) जर काळाच्या ओघात बदल केला आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घातली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येऊ शकते.

बीड जिल्ह्यातील (Beed) एका नवयुवक शेतकऱ्याने देखील ही गोष्ट अधोरेखित केली आहे. मित्रांनो खरे पाहता या वर्षी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर होता.

यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane) मोठे नुकसान देखील झाले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मौजे आरणवाडी येथील दत्तात्रेय गोकुळ माने यांना देखील भेडसावला. मात्र या नवयुवकाने खचून न जाता उसाला पर्यायी पीक म्हणून मिरचीची लागवड (Pepper cultivation) केली आणि अवघ्या 22 गुंठ्यात तब्बल नऊ लाखांचे उत्पन्न कमावण्याची किमया साधली.

निश्चितच या नवयुवकाचा हा शेती मधला बदल त्यांच्यासाठी मोठा फायदेशीर ठरला आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील मोठी प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आरणवाडी गावात 2000 मध्ये घागरवाडा तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या गावात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत उसाच्या शेतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. हुकूमचे पीक असल्याने व गावाजवळच तलाव असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यास सुरुवात केली. यावर्षी मात्र या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना अतिरिक्त उसाचा मोठा फटका बसला.

यामुळे माने यांनी उसाला पर्यायी पिकासाठी शोधाशोध सुरू केली तसेच काही तज्ञ लोकांचा सल्ला घेतला. शेवटी माने यांनी उसाला पर्यायी पीक म्हणून मिरची या भाजीपाला वर्गीय पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या 22 गुंठे क्षेत्रात मिरचीच्या लागवडीचे नियोजन आखण्यात आले. विशेष म्हणजे मिरची लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला. यामध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन प्रणालीचा समावेश आहे.

माने यांनी बेड बनवून मल्चिंग पेपर अंथरला मिरची लागवड केली आणि ठिबक सिंचन प्रणालीद्वारे योग्य ते पाण्याचे व्यवस्थापन केले. मिरची लागवड केल्यानंतर वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होऊ नये या हेतूने माने यांनी आपल्या शेताला तारेच्या कुंपणाने सुरक्षा कवच घातले.

मिरची पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी माने यांनी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा वेळोवेळी सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याने योग्य त्या कीटकनाशकांची तसेच औषधांची फवारणी केली.

माने यांनी जानेवारी महिन्यात 930 या मिरचीच्या जातीची लागवड केली. माणे यांनी लागवड केलेली मिरची एप्रिल महिन्यात काढणीसाठी तयार झाली असून आतापर्यंत मिरचीचे दोन तोडे झाले आहेत.

यातून माणे यांना नऊ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे मिरचीचे अजून तीन तोडे होणार असल्याचा माने यांचा अंदाज आहे. दत्तात्रय माने यांच्या मते मिरची पिकातून त्यांना एकूण बारा लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

निश्चितच या नवयुवक शेतकऱ्याचा हा प्रयोग अतिरिक्त उसासाठी एक उत्तम पर्याय ठरला असून इतर शेतकऱ्यांनी देखील माने यांच्या प्रमाणे शेती व्यवसायात बदल करणे महत्त्वाचे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts