ताज्या बातम्या

“तुमचे म्हसोबा बदलले, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडव्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, दिवा विझताना जास्त फडफडतो. तुमची अक्कल दीड वर्षे ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले. अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय.

तुमच्या तोंडाला दुसऱ्याच कोणीतरी भोंगा लावलाय. आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी हडपणारा सोमय्या (Kirit Somaiya) तुम्हाला प्रिय असेल, तर या महाराष्ट्र द्वेष्ट्याच्या गळ्यात शिवतीर्थावर नेऊन पदक घाला अशा कडव्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

ईडीचे अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय. तुमची वर्ष दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमचे म्हसोबा बदलले असतील. तुम्ही दुसरा शेंदूर लावून घेतला. मात्र, आमचा बाणा तोच आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, किरीट सोमय्याची लायकी शिव्या देण्याचीच आहे.

आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी रुपये हडप करणारा सोमय्या तुम्हाला प्रिय असेल, तर तुमचं खासगीचं पदक देऊन टाका.

या महाराष्ट्र द्रोह्याच्या गळ्यात शिवतीर्थावर ते पदक घाला. जर महाराष्ट्रावर, मुंबईवर कोणी थुंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक,

मराठी माणूस अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरेल. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांनी हीच भाषा वापरली असेही राऊत म्हणाले आहेत.

ढोंग आणि भंपकपणा सुरू असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले. एका द्वेषातून तुम्ही बोलताय. तुमच्या तोंडाला कोणीतरी भोंगा लावलाय. शिवसेनेचे हिंदुत्व प्रखर आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत.

शिवसेनाचा मुख्यमंत्री आहे. त्यांचा बाणा प्रखर हिंदुत्ववादी आहे. किरीट सोमय्या मुंबई-महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत केंद्राला जाऊन वारंवार सांगतोय असा घणाघाती आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts