ताज्या बातम्या

Zomato Down : अर्रर्र! झोमॅटोने अचानक बंद केली फूड डिलीवरी, का ते जाणून घ्या

Zomato Down : ‘झोमॅटो’ (Zomato) ही फूड कंपनी नागरिकांना ऑनलाइन खाद्य (Zomato online food) पुरवते. काही दिवसांपूर्वी झोमॅटोने आपल्या ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत अन्न पोहोच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

ग्राहकांचाही या कंपनीला चांगला प्रतिसाद असतो. परंतु, झोमॅटोने आता ऑर्डर (Order) घेणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे.

लोक मोठ्या प्रमाणात झोमॅटो वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करतात

देशभरातील लोक मोठ्या प्रमाणात झोमॅटो वापरतात(Use Zomato). लोक झोमॅटो वरून भरपूर खाद्यपदार्थ ऑर्डर करतात. महानगरांमध्ये याचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.झोमॅटोची देशभरात सुमारे 500 दशलक्ष ऑर्डर आहे.

ही संख्या 2026 पर्यंत 1.6 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक नोकऱ्याही करत आहेत. अशा स्थितीत सेवा (Zomato service) बंद झाल्याने सर्वांच्याच अडचणीत वाढ झाली आहे.

पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी तुंबण्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत लोक ऑनलाइन ऑर्डर करून अनेक खाद्यपदार्थ मागवत आहेत. पावसामुळे नागरिकांना वस्तू खरेदीसाठीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर न केल्याने लोक नाराज झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts