रस्त्याने चालता चालता लाखो रुपये पडलेले मिळावेत, असे स्वप्न अनेक जण बघतात, पण त्यांचे स्वप्न काही सत्यात उतरत नाही. काही मोजके भाग्यवान असे असतात की, ज्यांना असा अचानक धनलाभ होतो.
अमेरिकेच्या एका शहरात एका ७ वर्षांच्या मुलीसोबत असेच काहीसे घडले. ही मुलगी पार्कमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत आपला वाढदिवस साजरा करत असताना तिला तिथे एक हिरा सापडला. हा हिरा २.९५ कॅरेटचा आहे हे तिला नंतर कळले.
हा किस्सा अमेरिकेच्या पॅरागोल्ड शहरातील आहे. या शहरात राहणाऱ्या या भाग्यवान मुलीचे नाव आहे ॲस्पेन ब्राऊन. ही मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपला सातवा वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘क्रेटर ऑफ डायमंडस् ‘स्टेट पार्क’ मध्ये गेली होती.
या उद्यानात मौजमजा करत असताना तिला उद्यानात पडलेली एक चमकदार वस्तू दिसली. सहज म्हणून तिने ती वस्तू उचलून आपल्याजवळ ठेवली. घरी गेल्यानंतर जेव्हा तिने आपल्या पालकांना ती चमकदार वस्तू दाखवली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.