लाईफस्टाईल

रविवारी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार हिरव्या रंगाचा धुमकेतू

ब्रह्मांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आकाशगंगा, ग्रह, तारे अशा याबाबत रोज थक्क करणारी माहिती समोर येत असते. उल्कावर्षाव, धूमकेतूसारख्या अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटना या खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असतात.

अशाच एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची संधी येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी आपल्याला लाभणार आहे. या दिवशी हिरव्या रंगाचा एक धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.

हा धुमकेतू पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीचीही गरज भासणार नाही. नुसत्या डोळ्यांनी या हिरव्या रंगाच्या धुमकेतूचे दर्शन आपल्याला घेता येणार आहे. ही घटना एवढी विलक्षण आहे की, तब्बल ४०० वर्षांमध्ये एकदा आपल्याला अशी संधी लाभते.

‘निशिमुरा ग्रीन कॉमेट’ असे या धुमकेतूचे नाव आहे. याच महिन्यात १२ सप्टेंबर रोजी निशिमुरा धुमकेतू पृथ्वीच्या जवळ आला असून, त्याचा प्रवास पृथ्वीच्या दिशेने होत आहे. १७ सप्टेंबर रोजी हा धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts