लाईफस्टाईल

High-Protein Diet : Protein साठी अंडी आणि मांस खाण्याची गरज नाही, आहारात करा ‘या’ फळांचा समावेश !

High-Protein Diet : मांस, अंडी आणि मासे हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहेत यात शंका नाही, जर ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर शरीरातील पौष्टिक गरज पूर्ण होते आणि रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते, परंतु जे शाकाहारी लोक आहेत ते हे पदार्थ खात नाहीत. अशा स्थितीत त्यांना इतर पर्याय शोधावे लागतात.

पण तुम्हाला माहिती आहे का, काही फळे खाऊनही तुम्हाला प्रोटीन मिळू शकते. मांस, अंडी आणि मासे यांच्या एवढेच प्रोटीन या पदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी लोक शरीरातली प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी मांसाहारी पदार्थांवर अवलंबून न राहता आहारात या पदार्थांचा समावेश करू शकतात.

प्रोटीन समृद्ध असलेली फळे :-

1. संत्रा

संत्री आणि त्याचा रस कोणाला आवडत नाही, यात व्हिटॅमिन सी असते. शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यासाठी या फळाचे सेवन केले जाते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यात प्रोटीन देखील असते जे स्नायूंना मजबूत करते. म्हणूनच संत्र्याचे नियमित सेवन केले पाहिजे. शाकाहारी लोकांसाठी हे फळ उत्तम आहे.

2. पेरू

पेरू हे सामान्यतः पचनासाठी महत्त्वाचे फळ मानले जाते, परंतु हे प्रथिने मिळवण्यासाठी देखील खाऊ शकतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. पेरूमध्ये सुमारे ४.२ ग्रॅम प्रथिने आढळतात. पेरूचे थेट सेवन करणे चांगले. हे फळ तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता.

3. एवोकॅडो

एवोकॅडो हा प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो, जर तुम्ही एक वाटी एवोकॅडो खाल्ले तर शरीराला सुमारे 4 ग्रॅम प्रथिने मिळतील. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. प्रोटीनमुळे शरीराला ताकद मिळते. एवोकॅडोमुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते.

4. किवी

किवीची चव आपल्या सर्वांनाच आकर्षित करते, त्याचबरोबर हे फळ आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर मानले जाते. एक किवी खाल्ल्याने सुमारे 2.1ग्रॅम प्रथिने मिळतात. याशिवाय इतरही अनेक पोषक तत्वे मिळतात. याचा देखील तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts