लाईफस्टाईल

Ajab Gajab News : मिरच्या खाण्याचा नवा विश्वविक्रम ! एका वेळी खाल्ल्या इतक्या मिरच्या…

Ajab Gajab News : मसालेदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाणारे शौकीन खवय्ये असतात; परंतू एखाद्याने एका दणक्यात १३५ झणझणीत मिरच्या खाल्या तर आश्चर्य वाटले ना? पण ही वस्तुस्थिती आहे. स्वयंपाकाची लज्जत वाढवण्याचे काम मिरची करते, मग ती मिरची हिरवी असो अन्यथा लाल. याचा अर्थ असा नाही की, त्याचा वापर प्रमाणाबाहेर करावा.

साधारणपणे एक किंवा दोन मिरची खाल्यानंतर त्याचा आरोग्याला निश्चितच फायदा होतो; पण ज्याला मिरचीबद्दल प्रचंड आवड आहे, अशा एका ‘मिरची’ वीराने नुकतीच केलेली एक कृती जागतिक विक्रमापर्यंत जाऊन पोहोचली.

कॅनडास्थित माईक जॅक नामक अवलियाने केवळ ६ मिनिट ५० सेकंद या अल्पवेळेमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १३५ ‘तिखटजाळ’ अशा मिरच्या खाऊन स्वतःचाच विक्रम मोडला. या घटनेची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये झाली.

मात्र माईकची ही असाधारण खवय्येगिरी पाहून उपस्थितांना घाम फुटला. या अजब आणि गजब घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यामांवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये माईक याने डोक्याला लाल रंगाचा ‘बॅण्ड’ आणि हातामध्ये ‘ग्लोव्हज’ वापरल्याचे दिसत आहे.

या विश्वविक्रमानंतर माईक म्हणाला की, ‘सुरुवातीला मिरची लागली त्यामुळे अंगाची लाहीलाही उडाली. त्यानंतर एक एक करत अन्य मिरच्या जशा चावू लागलो तसतशी पोटामध्ये जळजळ वाढू लागली.

माईक जॅक याने खालेल्या मिरचीची प्रजात ही ‘कॅरोलिना रिपर्स’ नावाची होती. अमेरिकेतील काही ठिकाणी जगातील सर्वात तिखट अशा या प्रजातीचे उत्पादन घेतले जाते. साधारणपणे ही दिसताना हुबेहूब ‘सिमला मिरची’ सारखी पण आकाराने लहान.

या मिरचीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही खाल्ल्यानंतर तोंडाचा आतील भाग तिखटपणामुळे लालबुंद होतो. त्यामुळे मिरची खात असताना त्याचे ठरलेले प्रमाण लक्षात घ्यावे म्हणजे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत. तज्ज्ञांच्या मते, मिरचीमध्ये कॅप्साइसीन नावाचा असलेला घटक निरोगी शरीरामधील अनेक समस्या वाढवू शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts