Ajab Gajab News : शरीर हे नश्वर आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण तरीही जगभरातील अनेक धर्म आत्मा आणि पुनर्जन्म यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवून आहेत.
हिंदू संस्कृतीमध्ये तर आत्मा अमर असल्याचे छातीठोकपणे सांगितले जाते. ‘नैनं छिंदन्ती शस्त्राणी…’ हा आत्म्याच्या अमरत्वाबद्दलचा संस्कृत श्लोक आपण लहानपणापासून ऐकून आहोत.
पण वैज्ञानिक मात्र आत्मा ही संकल्पनाच पूर्वीपासून नाकारत आले आहेत. आता तर एका वैज्ञानिकाने शास्त्रीय आधारावर असा दावा केला आहे की, आत्मा अमर वगैरे काही नसतो, पुनर्जन्म हे देखील एक थोतांड आहे.
डॉक्टर सीन कॅरोल असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते जॉन्स हॉपकिन्स विश्वविद्यालयामध्ये कॉस्मोलॉजी या विषयाचे लेक्चरर आहेत. त्यांनी सांगितले की, जर सर्व काही वैज्ञानिक कसोट्यांवर तपासून पाहिले
तर मानवाचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काहीही शिल्लक उरत नाही. माणसाचा एकदा का मृत्यू झाला की त्याचा पुनर्जन्म होण्याची काडीमात्र शक्यता नसते.”
मृत्यूनंतर माणसाची चेतना जिवंत राहात असल्याचा एकही वैज्ञानिक पुरावा आजवर कोणत्याही शास्त्रज्ञाला मिळालेला नाही. डॉक्टर कॅरोल यांच्या मते माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कोणतीही चेतना ब्रह्मांडामध्ये शिल्लक राहात नाही.
असा कोणताही अणू किंवा एखादी शक्ती आजवर आढळून आलेली नाही की ज्याद्वारे असे सिद्ध करता येऊ शकेल की मृत्यूनंतरही माणसाचा आत्मा किंवा चेतना कोणत्याही स्वरूपात जिवंत असतात.