US aircraft : सूर्य म्हणजे तप्त वायूचा गोळा असे म्हणतात. सूर्यामधून उत्सर्जित होणाऱ्या महाप्रचंड ऊर्जेमुळे आपल्या पृथ्वीवर तुम्ही-आम्ही आणि अगणित जीवजंतू जिवंत आहेत. मात्र, या सूर्याच्या जवळ जाणे म्हणजे आगीशी खेळणे आहे.
अमेरिकेची अवकाश संस्था नासाने या आगीशी भिडण्याचा प्रयत्न केला आहे. नासाने सूर्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी पाठवलेले एक यान सूर्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. यानाने सूर्याच्या बाह्य आवरणातून कोट्यवधी वर्षांपासून उठत असलेल्या ‘आगीच्या वादळां’चे फोटो नासाला पाठवले आहेत.
सूर्याच्या या सर्वात बाहेरच्या आवरणाला ‘कोरोना’ असे म्हणतात. या कोरोनामधून सदा सर्वकाळ आगीचे लोळ उठत असतात. याला कोरोनल मास इंजेक्शन असे म्हटले जाते. या आगीच्या ज्वाळा एवढ्या भयंकर की त्या काही लाख किलोमीटरपर्यंत पोहोचतात. ज्यांना सोलार फ्लेअर्स असे म्हणतात.
नासाच्या या यानाचे नाव आहे ‘पार्कर सुमारे ९.२ दशलक्ष किलोमीटर दूर आहे. या आवरणामध्ये सतत सौरवादळे होत असतात. २२ सप्टेंबर २०२२ रोजी नासाचे हे यान सीएमईमधून आतमध्ये शिरले आहे.
असे करणारे हे पृथ्वीवरील पहिले मानवनिर्मित यान ठरले आहे. नासाने या यानाने टिपलेला एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पार्कर प्रोबच्या आजूबाजूंनी प्रचंड वेगाने प्रवास करणारे तारे, धूळ आणि आगीचे लोळ दिसून येत आहेत.