Marathi News : शहरांमध्ये उंच इमारती, मोठमोठी अपार्टमेंट झाली आहेत. या बिल्डिंग्जमध्ये वर खाली येण्याजाण्यासाठी लिफ्टचा वापर खूप जास्त वाढलेला आहे. लिफ्टला नेहमीच देखभालीची गरज असते, योग्य काळजी घेतली नाही तर ती बिघडू शकते.
लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने ती अचानक थांबू शकते. बऱ्याच लोकांना लिफ्टमध्ये बसायला भीती वाटते कारण जर लिफ्ट मधेच बंद झाली तर काय करावे असा प्रश्न त्यांना पडतो.
लिफ्ट मध्ये अडकल्यास काय करावे ?
1. मन शांत ठेवा
लिफ्ट अचानक थांबली तर घाबरू नका. पहिली गोष्ट म्हणजे शांत राहण्याचा प्रयत्न करा. चिंता आणि भीती बाळगण्याऐवजी शांत राहणे आपल्याला योग्य दिशेने पावले उचलण्यास मदत करू शकते.
2. मोबाइलद्वारे संपर्क करा
लिफ्टमध्ये नेटवर्क असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा गार्डला फोन करून लिफ्ट बंद असल्याची माहिती द्यावी. याच्या मदतीने तुम्ही लवकरच यातून सुटका मिळवू शकता.
3. इंटरकॉम किंवा आपत्कालीन बटण वापरा
लिफ्टमध्ये सहसा इंटरकॉम किंवा आपत्कालीन बटण असते. मोबाइल काम करत नसेल तर बटण दाबा किंवा इंटरकॉम गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
4. प्रतीक्षा करा
लिफ्टमधील तांत्रिक बिघाड अनेकदा कमी वेळात दुरुस्त केले जातात. त्यामुळे धीर धरा आणि प्रतीक्षा करा
5. पंखा चालू करा
आजकाल लिफ्टमध्ये ओव्हरहेड पंखे बसवले जातात. ते चालू केल्यास हवा येत राहील आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
6. दरवाजा ठोठावा
जर कोणतेच उपाय काम करत नसेल, तर हळूवारपणे दरवाजा ठोठावा जेणेकरून बाहेरील कोणीतरी तुम्हाला मदत करू शकेल.