Astro Tips 2024 : नवीन वर्षाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच २०२४ हे वर्ष सुरु होणार, नवीन वर्षाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. नवीन वर्षांने आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचे आहे, नवीन वर्षात प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन सुरु करण्याचा विचार करत असतो.
पण काही तरी नवीन सुरु करण्याआधी देवाची पूजा करणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. अशातच नवीन वर्षाची सुरुवात करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर हे नवीन वर्ष तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखे घालवता येईल. होय, आज आम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय उपाय केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळेल, हे सांगणार आहोत.
प्रत्येकजण आपल्या नवीन वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतो आणि आपले येणारे वर्ष आनंदाचे जावो अशी आशा देखील करतो. नवीन वर्ष नवी ऊर्जा, नवी आशा आणि भरपूर आनंद घेऊन येवो. यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वजण पहाटे लवकर उठतात, स्नान करतात, मंदिरात जातात, पूजा करतात आणि संपूर्ण वर्ष चांगले जावो अशी देवा कडे प्रार्थना करतात.
पण वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजेसोबत काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून काही उपायांबद्दल सांगणार आहोत, हा उपाय तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यास तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. कोणते आहेत हे उपाय चला बघूया.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा ‘हे’ उपाय !
-नवीन वर्षाची सुरुवात तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करून करावी. यानंतर मंदिरात जाऊन गंगाजल, बेलपत्र, अक्षत तांब्याच्या भांड्यात टाकून शिवलिंगावरही जल अर्पण करावे. यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. असे केल्याने सुख, समृद्धी आणि शांती वाढते. याशिवाय नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचा शोध संपेल आणि लवकरच चांगली बातमी मिळेल.
-नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात अन्न आणि वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. नवीन वर्षात गरीब मुलांना खायला द्या. याशिवाय तुम्ही त्यांना कपडे, गहू किंवा कोणतेही धान्य दान करू शकता. असे केल्याने धान्याचे भांडार वर्षभर भरलेले राहते. जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.
-घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकराचा अपार आशीर्वाद मिळतो. बेलपत्रात भगवान शिव राहतात असे म्हंटले जाते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात घरी बेलपत्राचे रोप लावून करा. लक्षात ठेवा की बेलपत्राचे रोप फक्त उत्तर दिशेला लावावे. असे केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
नवीन वर्षाच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे महिलांनी विशेषतः लाल रंगाचे कपडे घालावेत. लाल रंग हा आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो.