Astro Tips : तुळशीच्या रोपाला एक विशेष महत्त्व असून तुळशीला पूजनीय मानण्यात येते. तुळशीची दररोज पूजा करण्यात येते तसेच तिला जल अर्पण करण्याची प्रथा आहे. जीवनात अनेकांना काही ना काही समस्या येत असतात. त्यापैकी कोणाला व्यवसायात यश मिळत नाही.
तर काहींना रागावर नियंत्रण नसते, तसेच त्यांच्या घरात सतत कलह निर्माण होतो. परंतु जर तुमच्या बाबत असे होत असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही यावर उपाय मिळवू शकता. तुळशी किंवा पांढऱ्या फुलांचा तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल.
होईल रागावर नियंत्रण
जर तुम्हाला क्षुल्लक गोष्टींवरून अचानक राग येत असेल आणि तो राग अनियंत्रित होत असल्यास सोमवारी 11 वेळा नारायण मंत्राचा जप करा. तुम्ही ओम नमो भगवते नारायणाय या मंत्राचा जप केला तर तुमचा राग कमी होईल.
व्यवसायात नुकसान होणे
समजा तुमच्या व्यवसायात नुकसान होत असेल तर सोमवारी दोन पांढरी फुले घ्या. त्यांना तुमच्याकडे ठेवून रोज सकाळी व्यवसायासाठी जाताना ही फुले वाहत्या पाण्यात सोडून द्या. व्यवसाय वाढीबरोबरच तुमचे मनोबलही वाढून मन आणि शरीर शांत राहील.
तणावात असाल तर हे काम करा
काही जण जीवनाच्या व्यस्ततेत एकटे पडतात. त्यांनी सोमवारी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाची 11 वेळा प्रदक्षिणा करावी. तसेच त्यांना तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे त्यांना फायदा होईल.
घरातून जाताना करा हे काम
वाचन-लेखन क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या लोकांना काम करावेसे वाटत नाही, त्यांनी कार्यालयातून बाहेर पडण्यापूर्वी सरस्वती देवीच्या मूर्तीसमोर उदबत्ती लावून ‘ओम ऐन देवाय नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करावा. देवी सरस्वतीला नमस्कार करून घर सोडा.
कामात चूक झाली तर निराश नका होऊ
अनेकदा आपण ज्या कामात तज्ज्ञ असतो आणि समजा एखाद्या वेळेस ते काम चुकले तर आपली निराशा होते. त्यामुळे असे दिसते की आपल्याला काहीच माहित नाही. समजा तुमच्यासोबत असे दोन-तीन वेळा झाल्यास मन अस्वस्थ होऊन भरकटायला लागते. असे दिसते की आपल्याला काहीच माहित नाही. या भावनांना सकारात्मक वळण देण्यासाठी सोमवारी पांढऱ्या मोत्यांची माळ घातल्याने तुमचे मन शांत होईल.
होईल इच्छा पूर्ण
समजा तुमची इच्छा बराच वेळ पूर्ण होत नसल्यास नाराज होऊ नका. तुम्ही सोमवारी कच्चे दूध आणि गंगाजल पाण्यात टाकून ते शिवलिंगाला अर्पण करू शकता. तुम्ही असे केले तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल.
घरात कलह निर्माण होणे
घरातील कलहामुळे लोकांच्या समस्या सर्वात जास्त वाढत जातात. या विसंवादामुळे काही जण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांपासून दूर राहतात. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर सोमवारी सकाळी घराजवळील मंदिरात जा. एका भांड्यात संपूर्ण सुपारी आणि तांदूळ घेऊन ते दान करा. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरातील कलह संपुष्टात येऊन नात्यात प्रेम आणि गोडवा राहील.
यश मिळेल
बऱ्याच वेळा काही जण समोर असतानाही आपले कर्तृत्व ओळखू शकत नाहीत. त्यांच्याकडे सर्व काही असूनही काहीच नाही असे वाटते. त्यामुळे ते सतत त्रस्त राहतात. त्यांनी सोमवारी कुश किंवा घोंगडीच्या आसनावर बसून तुळशी किंवा रुद्राक्षाच्या माळांनी ओम ऐं हरी सोमया नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. या मंत्राचा जप केला तर त्यांचे मन शांत राहते.
कामात अडथळे आल्यास हे काम करा
कधी कधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. सतत त्यांना अडथळे किंवा अपयशाला सामोरे जावे लागते. जर तुम्ही सोमवारी संध्याकाळी माँ कालीची पूजा केली तर तुम्हाला फायदा होईल. तसेच घरामध्ये रोज सकाळी, संध्याकाळी धूप जाळावा.
अभ्यासात मुलांचे मन रमत नसेल तर करा हे काम
सोमवारी घरात पांढर्या फुलाचे रोप आणून लावून त्याला नियमित पाणी द्यावे. जशी त्याची फुले उमलतात. तसे, मुलाचे हृदय आणि मन अभ्यासात लागेल. तुमच्या मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल किंवा तो लक्षात ठेवलेल्या गोष्टी विसरत असल्यास तुम्ही हा उपाय सोमवारी करू शकता.