Best Snacks For Diabetics : मधुमेही रुग्णांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना त्यांचा आहार देखील विचारपूर्वक ठरवावा लागतो. त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीबद्दल खूप जागरूक राहावे लागते. अशातच रक्तातील साखरेची पातळी नेहमी संतुलित राहावी म्हणून व्यायाम देखील केला पाहिजे. एवढेच नाही तर मधुमेहाचे रुग्ण स्नॅक्स म्हणून काय खातात, याचीही जाणीव ठेवली पाहिजे.
अनेक वेळा मधुमेही रुग्ण स्नॅक्स खाण्याबाबत बेफिकीर होतात. याचा परिणाम असा होतो की काही काळानंतर त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत तीव्र बदल दिसून येतात. साहजिकच अशी परिस्थिती योग्य नाही. स्नॅक्स म्हणून आहारात काय घ्यावे, हा प्रश्न आहे. आजच्या या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
-मधुमेहाचे रुग्ण स्नॅक्स म्हणून अंड्याचे सेवन करू शकतात. अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका उकडलेल्या अंड्यामध्ये 6 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असतात. हे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखण्यास मदत करते. अंडी खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, जे तुम्हाला अतिरिक्त कॅलरीज घेण्यापासून प्रतिबंधित करते.
-मधुमेहाचे रुग्ण स्नॅक्स म्हणून चायनीज पदार्थ खाण्याऐवजी बदाम खाऊ शकतात. बदाम हे केवळ आरोग्यदायी नसतात, तर ते खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. बदाम खाल्ल्याने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
-मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्नॅक म्हणून अॅव्होकॅडो हा एक उत्तम पर्याय आहे. अॅव्होकॅडोमध्ये फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. वनस्पतींमधून मिळणाऱ्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटला आहाराचा भाग बनवल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यासही मदत होते.
-मधुमेहाच्या रुग्णांसाठीही सफरचंद चांगला पर्याय ठरू शकतो. यात अनेक प्रकारचे पोषक असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. सफरचंदात व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात. त्याचबरोबर पीनट बटरमध्ये मिसळून खाल्ल्यास पोषकतत्त्वे वाढू शकतात. पीनट बटरमध्ये जास्त फायबर असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हा एक चांगला पर्याय मानला जातो.
-मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिया सीड्स पुडिंग हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. चिया सीड्स पुडिंग खाण्यासाठी तुम्हाला चिया बिया दुधात भिजवाव्या लागतील. ते पुडिंगसारखे दिसू लागताच तुम्ही त्याचे सेवन करा. चिया बिया अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी मानले जातात. प्रथिने, फायबर आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड चिया बियांमध्ये आढळतात. या सर्व गोष्टी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.